मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी वाझेला १०० कोटी वसुलीचं टार्गेट दिल्याचा गंभीर आरोप केला होता. आता मनसुख हिरेन यांच्या मृत्यूप्रकरणी निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे याने देखील लेटरबॉम्ब टाकत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणखी खळबळ उडवून दिली आहे.
कोर्टापुढे वाझेनी सादर केलेल्या जबाबामधून आतापर्यंतच्या सर्वात धक्कादायक गोष्टी पुढे आल्या आहेत. त्यांनी एनआयए कोर्टासमोर हस्तलिखित पत्र सादर केलं आहे. या पत्रात सचिन वाझे याने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह महाविकास आघाडीतील आणखी काही मंत्र्यांवर गंभीर आरोप केले आहेत. यासोबतच, तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे २ कोटींची मागणी केल्याचा गौप्यस्फोट देखील केला आहे. यात शिवसेनेचे नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचे देखील नाव वाझेने घेतले आहे.
‘पुन्हा सेवेत घेण्यास शरद पवार यांचा विरोध आहे. तेव्हा गृहमंत्र्यांनी सांगितलं की ते पवारांचं मन वळवतील आणि त्यासाठी त्यांनी माझ्याकडे 2 कोटी रुपयांची मागणी केली.’, अशी मागणी गृहमंत्री अनिल देशमुखांनी आपल्याकडे केली होती असं वाझे म्हणाले आहेत. ‘आपल्याला एवढी मोठी रक्कम देता येणार नसल्याचं सांगितलं. त्याबरोबरच अनिल देशमुखांनी प्रत्येक बारमधून साडेतीन लाख वसूल करून आणा’, असंही सांगितल्याचं सचिन वाझेनी नमूद केलं आहे. यासोबतच, ;मंत्री अनिल परब यांच्यावरही खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप केलाय.
महत्वाच्या बातम्या
- ‘लॉकडाऊनचा निर्णय मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही’
- १०० कोटी वसुली प्रकरणात तपासाला वेग; सीबीआयला ही हवाय वाझेचा ताबा
- सुप्रिया ताई…. पाहिलंत का…? अकेला देवेंद्र क्या क्या कर सकता है?
- पंढरपूर निवडणुकीमध्ये भाजपला आणखी एक धक्का; ‘या’ हुकुमी एक्क्याला कोरोनाचा विळखा
- निर्णय जाहीर करून मुख्यमंत्री ‘मातोश्री’त बसलेत; भाजपची बोचरी टीका
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

