टीम महाराष्ट्र देशा:शेतकऱ्यांप्रमाणे मागासवर्गीय महामंडळाची कर्जे त्वरित माफ करावीत, केंद्र व राज्यातील मागासवर्गीय अनुशेष भरून काढावा तसेच जे एन यु विद्यार्थी व शिक्षकांच्या हल्लेखोरांना त्वरित अटक करून कायदेशीर कारवाई कारण्यात यावी, आदी मागण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या (आठवले गटाच्या )वतीने जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे येथे तीव्र निदर्शने करण्यात आली.
‘रिपाइं’चे अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशाप्रमाणे ही निदर्शने करण्यात आल्याचे, तसेच या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना देण्यात आल्याचे शहराध्यक्ष अशोक शिरोळे यांनी सांगितले.यावेळी ‘रिपाइं’चे शहर संपर्कप्रमुख अशोक कांबळे, शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, कार्याध्यक्ष संजय सोनावणे, बसवराज गायकवाड, शहर सचिव महिपाल वाघमारे आदी उपस्थित होते.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
