टीम महाराष्ट्र देशा : लोकसभा निवडणुकांपूर्वी आपचे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कॉंग्रेसशी युती करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यांना त्यात अपयश आले होते.
कॉंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी ‘काँग्रेससोबत आघाडी करण्याचे प्रयत्न करत असताना दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे जरा जास्तच अतिशहाणपणा दाखवत होते असं विधान केल आहे. तसेच, निवडणुकीनंतर केजरीवाल यांना कळेल की त्यांची दिल्लीमध्ये लायकी काय आहे ते कळेल. काँग्रेसचा वापर करून दिल्लीबाहेर आपली ताकद वाढवण्याचा केजरीवाल प्रयत्न करत होते असा आरोप सिब्बल यांनी केला आहे.
आपसोबत आघाडी झाली असती तर दिल्लीमध्ये त्याचा फायदा काँग्रेस आणि आप या दोन्ही पक्षांना झाला असता असंही सिब्बल पुढे बोलताना म्हणाले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

