Share

WHO चे डायरेक्टर डॉक्टर टेड्रोस एधानोम यांचे दीपिका-प्रियांका’ ला ‘सेफ हँड्स चॅलेंज

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : चीनमध्ये उगमस्थान असलेल्या कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जगभरात धुमाकूळ घातला आहे. देश आणि विदेशात शाळा, महाविद्यालयं आणि कार्यालयं बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या या प्रादुर्भावापासून झालेल्या देशात स्वताला या संसर्गापासून रोखाण्यासाठी त्या देशातील नागरिकंसह सरकारही सोशल मीडियावरूनही जनजागृती करताना दिसत आहे.

जगभरातील लोक गर्दीत जाणं टाळा, आपले हात सतत स्वच्छ करा यांसारख्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. अशातच वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायजेशन (WHO)ने देखील सोशल मीडियावरून अनेक सेलिब्रिटींना याबाबत जनजागृती करण्याचं आवाहन केलं आहे. WHO चे डायरेक्टर जनरल डॉक्टर टेड्रोस एधानोम यांनी ट्विटरवरून जगभरातील अनेक सेलिब्रिटींना टॅग करून सेलिब्रिटींना ‘सेफ हँड्स चॅलेंज’ स्विकारण्याची विनंती केली आहे.

https://twitter.com/DrTedros/status/1238412520135757824?s=20

ग्लोबल स्टार्सनी सेफ हँड्स चॅलेंज स्विकारून आपला व्हिडीओ शेअर करावा. तसेच आपल्या सोबत आणखी तीन व्यक्तींना हे चॅलेंज द्यावं. आपण सर्व एकत्र येऊन या व्हायरसशी दोन हात करू शकतो.’ असं ट्वीट टेड्रोस यांनी केलं आहे. दरम्यान,कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेक सेलिब्रिटिनीदेखील आपला परदेश दौरा रद्द केला आहे. तर चित्रपट असोशिएशनेही अनेक चित्रपट आणि कार्यक्रमांचे शुटींग थांबिण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे बॉलीवूड च्या अभिनेत्री दीपिका पदुकोन आणि प्रियांका चोप्रा देखील घरीच आहेत. दीपिकाने इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर करत सांगितलं आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ती फ्री टाइमचा सदुपयोग करत आहे. तसेच आपला वॉर्डरोब स्वच्छ करत आहे.

तर राज्यांमध्ये मॉल्स, चित्रपटगृह, जिम आणि स्विमिंग पूल्स बंद करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. कार्तिक आर्यन आणि कियारा अडवाणी स्टारर चित्रपट भूल भुलैया 2चं शुटिंगही थांबवण्यात आलं आहे. एवढचं नाहीतर 24 मार्च रोजी रिलीज करण्यात येणारी अक्षय कुमार आणि कटरीना कैफ स्टारर फिल्म सूर्यवंशीची रिलीज डेटही पुढे ढकलण्यात आली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!