मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात ड्रग अँगलच्या तपासणीत एनसीबी सक्रिय आहे. या चौकशीत अनेक सेलिब्रिटींची नावं अमली पदार्थांचं सेवन करणाऱ्यांमध्ये आधीच आलं आहे. तर अनेकांची नावं अजूनही बाहेर येणं बाकी आहे. शनिवारी (२६ सप्टेंबर) दीपिका पादुकोण, सारा अली खान आणि श्रद्धा कपूर यांची स्वतंत्रपणे चौकशी केली गेली. दीपिका सकाळी १० वाजता एनसीबीच्या गेस्ट हाउसवर चौकशीसाठी पोहोचली होती. पाच तासांहून जास्त चाललेल्या या चौकशीत दीपिका तीन वेळा रडल्याचं म्हटलं जातं.
अधिकाऱ्यांनी दीपिकाचा फोन केला सील दरम्यान, दीपिका पादुकोणचा फोनही आता अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतला आहे. आयएएनएसच्या वृत्तानुसार, एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय पुरावा अधिनियमांतर्गत दीपिका, करिश्मा, रकुल आणि सिमोन खंबाटा यांचे फोन एनसीबीने हस्तगत केले आहेत.
गर्दी टाळण्यासाठी दीपिका थांबली हॉटेलमध्ये
शुक्रवारी रात्री दीपिका गोव्याहून मुंबईला परतली. तिच्यासोबत तिचा नवरा रणवीर सिंगही होता. गोव्यात दीपिका शकुन बत्राच्या आगामी सिनेमाचं चित्रीकरण करत होती. गोव्याहून मुंबईत परतल्यावर दीपिकाने घरी न जाता एनसीबी कार्यालयाजवळील हॉटेलमध्ये राहणं पसंत केलं. माध्यमांचा त्रास टाळण्यासाठी आणि वेळेत एनसीबीपर्यंत पोहोचण्यासाठी तिने हा निर्णय घेतला होता. सारा आणि श्रद्धा यांनीही ड्रग्ज घेण्यास नकार दिला.
महत्वाच्या बातम्या :-
- आम्ही शिवसेनेशी मनापासून देखील दूर मात्र गोत्र एकच : सुधीर मुनगंटीवार
- नगराध्यक्ष पदासाठी प्राजक्त तनपुरेंनी दिली अनिता पोपळघटांना संधी
- ‘या’ बहाद्दराने पेटविली कृषी विद्येयकाची देशातील पहिली होळी
- वाजपेयींच्या सरकारमध्ये मोलाचा वाटा निभावणाऱ्या माजी केंद्रीय मंत्री जसवंत सिहांचे निधन
- संजय राऊतांचा रोखठोक म्हणाले, गांधीजींच्याच वावरण्यानेच देश थोडा जिवंत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

