Share

मी करतो, तुम्ही पण करा; दीपक म्हैसेकर यांचे नागरिकांना आवाहन

Published On: 

पुणे : “आम्ही रक्तपेढीच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली. शहरातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा थोडा कमी झाला आहे. मी सर्व जनतेला रक्तदानाचं आवाहन करतो.शहरातील नागरिकांनी आपलं ओळखपत्र घेऊन दवाखान्यात किंवा रक्तपेढीत जाऊन रक्तदान करावं, असं आवाहन पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नागरिकांना केले आहे.

राज्यभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला आहे. महाराष्ट्रातील सर्वाधिक रुग्ण पुणे, पिंपरी चिंचवड शहारात आहे. मात्र या कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुणे शहरात रक्ताचा साठा कमी झाला आहे. त्यामुळे आपतकालीन स्थितीत रुग्णांच्या उपचार करण्यावर मर्यादा येत आहेत. त्यामुळेच पुणे विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी नागरिकांना रक्तदानाचं आवाहन केलं आहे.

आम्ही रक्तपेढ्यांनी नियोजनबद्धपणे एका ठिकाणी 15 हून अधिक लोक जमा होणार नाही याची काळजी घेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. रक्तपेढ्यांकडे अनेक रक्तदात्यांचे संपर्क क्रमांक आहेत. त्यांना रक्तपेढ्यांनी प्रमाणपत्रंही दिली आहेत. ही प्रमाणपत्र किंवा त्यांचं कुठलंही ओळखपत्र तपासून रक्तदात्यांची ओळख निश्चित केली जाईल. याचा उपयोग करुन हे रक्तदान घेता येईल.” असं त्यांनी यावेळी म्हंटल आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!