🕒 1 min read
बीड : अतिवृष्टीमुळे बीड जिल्ह्यातील पिके आणि शेत जमिनीचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी शासनाने दस-यापूर्वी अतिवृष्टीची नुकसान भरपाई जाहीर करावी, अशी मागणीही त्यांनी केली. पीक विमा मिळत नसल्यानं शेतकऱ्यांवर आसमानी आणि सुलतानी संकट ओढवलंय. त्यामुळे आता शासनाने शेतकऱ्यांच्या पाठिशी उभं राहून त्यांना मदत करावी, अशी मागणी देखील पंकजा मुंडे यांनी केली आहे.
दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पंकजा म्हणाल्यात की, बीड जिल्ह्यात अतिवृष्टीने साडेपाच लाख हेक्टरांवरील पिकांना फटका बसला असून सोयाबीन, कापूस, उडीद, मुग, बाजरी आदी पिके पूर्णपणे उध्वस्त झाली आहेत. जिल्ह्यात पिकांचेच नाही तर शेत जमिनीची माती वाहून गेल्याने मोठे नुकसान झाले आहे. जीवीतहानीही मोठ्या प्रमाणावर झाली असून २३ जणांचा मृत्यू झाला आहे तर ४५० च्या आसपास जनावरांचाही मृत्यू झाला आहे.
अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या हाता तोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे, त्यातच पीक विमा मिळत नसल्याने शेतकऱ्यांवर आसमानी व सुलतानी असे दोन्ही संकट एकाचवेळी आली आहेत. शासनाने अशा कठीण समयी त्यांच्या पाठिशी उभे रहावे आणि दस-यापूर्वी नुकसान भरपाई जाहीर करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘पानिपत’कार विश्वास पाटील यांना राजीव सारस्वत सन्मान प्रदान
- ‘नवाब मलिक यांनी मंत्रिपदाचे भान सोडून एनसीबीने अटक केलेल्या आरोपींची वकिली सुरू केल्याचे दिसते’
- अन्नदात्यासाठी जनतेने ‘महाराष्ट्र बंद’ला स्वतःहून पाठिंबा द्यावा – नवाब मलिक
- वेळ आली तर कर्ज काढू, पण शेतकऱ्यांना मदत करू; अजित पवार यांची ग्वाही
- नुकसान भरपाईसाठी शेतकरी संघर्ष समिती आक्रमक, रास्ता रोको करत दिला इशारा


