मुंबई : कोरोनाचा फटका सर्व घटकांना बसत आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील तीनही वीज कंपन्या आणि वीज नियामक आयोगामध्ये समन्वय साधून सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा दिलासादायक आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
‘वाणिज्यिक व औद्योगिक दर येणाऱ्या पाच वर्षांमध्ये वापर आकारानुसार सुमारे 10 ते 15 टक्के कमी करण्यात आलेले आहेत. तर घरगुती विजेचे दर हे वापर आकारानुसार 5 टक्के एवढे कमी करण्यात आले आहेत. याचप्रमाणे राज्यातील वीजदर सरासरी 7 टक्के कमी करण्यात आले आहेत.’
तसेच ‘औद्योगिक व व्यावसायिक ग्राहकांवर पुढील 3 महिने स्थिर आकार लागू होणार नाही. कृषी ग्राहकांना कोणतीही वीज दरवाढ करण्यात आलेली नाही. सोलर रूफ टॉप वापरणाऱ्या ग्राहकांना कोणताही अतिरिक्त भार नाही. तसेच औद्योगिक आणि व्यावसायिक वीज ग्राहकांना वाढीव वीज वापरांवर 75 पैसे प्रति युनिट सवलत राहणार आहे.
दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घरगुती वापराच्या बिलांचे मीटर रीडिंग घेण्यात येणार नाही. मागील महिन्याच्या सरासरी बिलावरून वीज बिल तयार करण्यात येईल. मार्च महिन्याचे बिल 15 मे पर्यंत तर एप्रिल महिन्याचे बिल 31 मे पर्यंत भरण्याची सवलत देण्यात आलेली आहे, अशी माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊतांनी दिली.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

