🕒 1 min read
औरंगाबाद: तीन वर्षापूर्वी शहरालगत असलेल्या साजापूर-करोड़ी ग्रामपंचायतीची निवडणुक घेण्यात आले होती. यात अंकुश अच्युतराव राऊत यांची थेट जनतेमधून सरपंच म्हणून निवड झाली होती. मात्र नियमाला बगल देत ठराव पारित करून बांधकाम परवानगी दिल्याप्रकरणी साजापूर-करोड़ी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच व सर्व १२ ग्रामपंचायत सदस्यांना अपात्र ठरवल्याचा महत्वपूर्ण निकाल ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिला. महत्वाचे म्हणजे या प्रकरणात अप्पर विभागीय आयुक्तानी दिलेला निकाल कायम ठेवला आहे. साजापूर-करोड़ी ही ग्रुप ग्रामपंचायत असून सदस्य संख्या तेरा आहे.
पदाधिकाऱ्यांनी २० जानेवारी व २ फेब्रुवारी २०१८ मध्ये घेण्यात आलेल्या मासिक बैठकीत नियमाला फाटा देत बांधकाम परवानगीचा ठराव घेऊन मंजुरी दिली. बांधकाम परवानगी देताना जिल्हाधिकारी यांची अकृषिक परवानगी तसेच हा परिसर सिडको व एमआयडीसी हद्दीत येत असल्याने संबधित विभागाची परवानगी घेणे बंधनकारक आहे. तसे न करता ठराव पारित केल्याने या ग्रामपंचायतीचे सदस्य शेख ईस्माईल यानी पंचायत समिती, जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त आदीकडे तक्रार केली होती.
त्याची चौकशी झाल्यानंतर अप्पर विभागीय आयुक्त विजयकुमार फड यांनी ६ फेब्रुवारी २०२१ रोजी सरपंच अंकुश राऊत, उपसरपंच शेणा युसुफ, ग्रामपंचायत सदस्य सय्यद विस्मील्ला, उत्तम पन्सोडे, शेख मैनुबी, देवीदास गवादे, भिवसन जायव, वर्षा जाधव, शेख मुसा, शोभाबाई जाधव, शेख फरीन, पार्वताबाई नवले, भिवसन जाधव यांना अपात्र ठरविले होते.
अप्पर विभागीय आयुक्त फड यानी दिलेला निकाल मान्य न झाल्याने सरपंच राऊत यांनी ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्याकडे अपील दाखल केले होते. त्यावर मंजलयात नुकतीत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी झाली. दरम्यान सर्वाचे म्हणणे ऐकुण येत महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३० (१) नुमार सरपच, उपसरपंच व सदस्य दोषी आढळल्याने ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी अप्पर विभागीय आयुक्तांनी दिलेला निकाल कायम ठेवत अपितार्थी सरपंच अकुश राऊत याचे अपील अमान्य केले.
महत्वाच्या बातम्या
- परमबीर सिंग यांच्या राजीनाम्यानंतर संजय राऊत यांची प्रतिक्रिया; भाजपला दिला इशारा
- दोनच दिवसात तब्बल १४१ व्यापारी पॉझिटिव्ह
- नवल! तलावातून चार क्विंटल माशांची चोरी
- कोरोनाचा वाढता उद्रेक, मनपा वाढवणार कोविड सेंटरची संख्या
- हेमंत नगराळे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी वर्णी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
