Share

तुळजापुरात होतेय चोरीचोरी छुप्या पध्दतीने दारु-तंबाखू विक्री

Published On: 

🕒 1 min read

तुळजापूर : कोरोना संसर्गजन्य आजाराचा पार्श्वभूमीवर शहर व तालुक्यातील दारुची दुकाने बिअरबार विक्री जिल्हाधिकारींचा आदेशाने गेली दीड महिन्या पासुन बंद आहेत माञ तरीही तिप्पट चौप्पट दराने दारु गुटखा तंबाखु पुढी आजही विक्री होत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. काही ठिकाणी तर बिनधास्त पणे बनावट दारु ओरीजनल म्हणून विकली जात आहे यामुळे पिणा-यांचा आरोग्यांवर मोठा परिणाम होत आहे.

या प्रकरणी बिअरबार दारु दुकाने स्टाँक ची तपासणी यंञणे मार्फत करून संबंधितांवर कारवाई ची मागणी होत आहे. सध्या शंभरची दारु बाटली चारशे रुपयाला तर दहा रुपयाची तंबाखु पुडी चाळीस तसेच गुटखा देखील याच भावात गुपचुप विकला जात असल्याची चर्चा आहे.

काही महाभाग तर गावठी दारुत थंड पेय टाकुन विकत आहे. सध्या बार दारु विक्री दुकांनाच्या ऐवजी गल्लीबोळात तसेच हातभट्टी दारु अड्यावर गर्दी होत आहे.कोरोना पार्श्वभूमीवर दारु विक्री बंदी आदेश निघताच दुकानातुन दारु विक्री बंद झाल्या माञ येथील बाटल्यांना पाय फुटुन त्या बाटल्या ग्राहकाकडे चौपट दराने ओळखीच्या नियमीत ग्राहकाकडे निविघ्न पणे पोहचत आहेत अशी चर्चा आहे.

अजूनही मजुरांना तिकीट काढूनचं जावं लागतय, ‘त्या’बाबत रेल्वेकडून कोणताचं आदेश आला नाही

कोरोनामुळे विदेशी पिणारे हातभट्टीवर आले आहेत.संचार बंदी लाँकडाऊन काळात किमान ग्रामसमिती मार्फत दारु तंबाखू विक्री वर आळा घालणे गरजेचे आहे यामुळे अनेकांचे दारु व्यसन सुटणे शक्य होते माञ नियमांची ग्रामसमिती व पोलिसांकडून अमंलबजावणी केली जात नसल्याने बंदी असुन सुध्दा दारु तंबाखू गुटखा विक्री छुप्या पध्दतीने निर्विघ्न पणे सुरु असल्याची चर्चा नागरिकांन मधुन होत आहे.

एवढा सगळा काळाबाजार सुरु असताना याची माहीती उत्पादन शुल्क विभागाला कशी मिळाली नाही या बद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. आतातरी उत्पादन शुल्क विभागाने लक्ष घालुन संबंधितांनवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

महावितरणच्या ग्राहकांना मोठा ‘दिलासा’; वाचा काय आहे प्रकरण

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!