Share

लोकमंगल फौंडेशनकडून ४ हजार गरजूंना दररोज अन्नदान

Published On: 

सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या लोकमंगल फौंडेशनच्यावतीने विडी कामगार, यंत्रमागधारकांसह बेघर आणि गरीब अशा सुमारे ४ हजार लोकांना रोज घरपोच अन्नदान करण्यात येत आहे. यासाठी सुमारे ३० कर्मचारी परिश्रम घेत आहेत.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला. संचारबंदी लागू असल्यामुळे कामानिमित्त त्यांना घराबाहेर पडता येत नाही. हाताला कामनसल्यामुळे त्यांची उपासमार होत आहे. त्यामुळे लोकमंगल फौंडेशनच्यावतीने हा उपक्रमसुरू करण्यात आला आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवासांपासूनच लोकमंगल जिवक हॉस्पिटल (निलमनगर) येथे गरजू लोकांना जेवणाची सोय करण्यात आली. पहिल्या दिवशी ७०० लोकांनी याचा लाभ घेतला. त्यानंतर ती संख्या वाढत जात आज चार हजारांवर गेली आहे. गरजूंची संख्या वाढत असल्याने लोकमंगलने त्यांची यादी करत घरपोच अन्नदान करण्याचा निर्णय घेतला. यासाठी प्रत्येक परिसरातील भाजपच्या बुथ प्रमुखांशी संपर्क साधून गरजू लोकांची यादी मागवण्यात आली.

सध्या निलमनगर, आकाशवाणी केंद्र, विनायक नगर, कुमठा नाका, विजापूर रोड गरिबी हटाव झोपडपट्टी, जुळे सोलापुरातील गणेश बिल्डर, नई जिंदगी, प्रभाकर नगरसाह विविध ठिकाणी सुमारे ४ हजार लोकांना रिक्षाद्वारे दोनवेळचे अन्नदान सुरू आहे. यासाठी लौकमंगल फौंडेशन प्रमुख संदीप पिसके, शुभांगी भोसले, दिपाली नंदूरकर, विजया साठे, लोकमंगल बँक कर्मचारी स्टाफ यासह नगरसेवक श्रीनिवास करली, वरलक्ष्मी पुरूड, अश्विनी चव्हाण,राजश्री चव्हाण, व्यंकटेश कोंडी, परिवहन सदस्य भैरण्णा भैरामडी, शशि थोरात आदींचे सहकार्य लाभत आहे. संचारबंदी संपेपर्यंत हा उपक्रमसुरू राहणार असून गरजू लोकांनी लोकमंगल फौंडेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विडी कामगार, मजूर, बेघर, गरीब लोकांना दोन वेळचे अन्नदान सुरू आहे. संचारबंदी संपेपर्यंत हा उपक्रमसुरू राहणार आहे. गरजू लोकांनी फौंडेशनशी संपर्क साधावा, त्यांनाही अन्नपुरवठा सुरू करण्यात येईल, असे फौंडेशन प्रमुख संदीप पिसके यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून आमदार सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगलकडून अन्नपूर्णा योजनेंतर्गत निराधार लोकांना ५०० डब्यांचे वाटप सुरू आहे. संचारबंदीच्या काळातही त्या लोकांना हे वाटप घरपोच केले जात आहे. याशिवाय सध्यस्थितीला इतर ४ हजार लोकांना रोज अन्नदान सुरू केले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!