🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : मुंबई – पुणे प्रवाशींसाठी आता खुश खबर आहे. येत्या सोमवारपासून (८जुलै) अश्वमेध व शिवनेरीच्या दादर ते पुणे स्टेशन तिकिटात तब्बल ८० ते १२० रुपयांची कपात करण्यात आली आहे. याबाबत माहिती परिवहन मंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी दिली आहे.
पुणे-मुंबई धावणारी शिवनेरी बस हि सुरक्षित, आरामदायी व एसी असलेली बस असून नवीन दर ४४० रुपये इतके असतील. ओला, उबेर, व इतर खासगी वाहनांचे तिकीट दर शिवनेरीच्या तुलनेत कमी असल्याने याचा फटका शिवनेरीला बसत होता. त्यामुळेच कमी दरात उत्तम सुविधांचा लाभ आता शासनाच्या या निर्णयाने सामान्य प्रवाशींना घेता येणार आहे.
शिवनेरी या प्रतिष्ठीत बस सेवेची लोकप्रियता लक्षात घेऊन, ही प्रतिष्ठीत सेवा सर्वसामान्य लोकांच्यापर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त प्रवासी संख्या वाढवणे, हा तिकीट दर कमी करण्याचा उद्देश असल्याचं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

