Share

संचारबंदीचा एसटीला फटका, सात दिवसात ९३ लाखांचे नुकसान

Published On: 

🕒 1 min read

हिंगोली : जिल्ह्यात १ ते ७ मार्चदरम्यान सात दिवसांच्या कालावधीत तिन्ही आगारांतील एसटी बसेस बंद असल्यामुळे महामंडळाला ९३ लाखांचे नुकसान झाले आहे. व्यापारी प्रतिष्ठाने बंद असल्याने माल वाहतुकीवरही परिणाम झाल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे. यामुळे संचारबंदीमुळे शासकीय व अशासकीय अशा दोन्ही क्षेत्रांला नुकसान झाल्याचे दिसून येत आहे.

जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळून येत असल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा प्रशासनाने २४ फेब्रुवारी रोजी आदेश काढून सकाळी सात ते सायंकाळी सात अशी संचारबंदी घोषित केली होती. तरीही रुग्ण आढळून येत होते. यानंतर रुग्ण वाढत असल्याचे पाहून लगेच १ ते ७ मार्च अशी संचारबंदी जाहीर केली. पण या संचारबंदीत एसटी बसेस ही बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे या कालावधीत एसटीला आपल्या कमाईतील तब्बल ९३ लाख गमवावे लागल्याची माहिती येत आहे.

जिल्ह्यात कोरोना आजाराचे प्रमाण अजूनही कमी झाले नाही. कोरोनाचा आकडा दोनअंकी झाला आहे. त्यामुळे प्रवाशांनी प्रवास करतेवेळेस स्वत:बरोबर इतरांची काळजी घेत मास्कचा उपयोग करावा. तसेच सॅनिटायझर सोबत ठेवावे. बसमध्ये चढतेवेळेस सामाजिक अंतर ठेवावे, असे आवाहनही एस. टी. महामंडळाच्या वतीने प्रवाशांना करण्यात आले आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!