Share

कोरोना बंदोबस्तासाठी पुण्यात सीआरपीएफ जवानांची एक तुकडी तैनात करणार

Published On: 

पुणे : कोरोनाच्या संकटात पोलीस दल सक्षमपणे आपले कर्तव्य बजावत आहे. गेले दोन महिने पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. त्यामुळे आता पोलीस दलाला काहीशी विश्रांती देण्यात येणार असून राज्यात केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या तुकड्यांना (सीआरपीएफ) बंदोबस्तासाठी तैनात करण्याचा निर्णय राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी घेतला आहे.

तैनात होणाऱ्या तुकड्यांपैकी एक तुकडी पुण्यातही दाखल होणार आहे. पुणे शहरातील 69 भाग प्रतिबंधित क्षेत्र जाहीर केले आहेत. प्रतिबंधित भागासह शहराच्या वेगवेगळ्या भागांत सध्या पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. सलग बंदोबस्तामुळे पोलिसांवर ताण आला आहे. प्रतिबंधित भागातील काही ठिकाणी ‘सीआरपीएफ’ची एक तुकडी तैनात करण्यात येणार आहे. ‘सीआरपीएफ’चे जवान पोलिसांना साहाय्य करणार आहेत, अशी माहिती विशेष शाखेतील पोलीस उपायुक्‍त मितेश घट्टे यांनी दिली.

दरम्यान राज्यात ‘सीआरपीएफ’च्या 20 तुकड्या बंदोबस्तासाठी देण्यात याव्यात. बंदोबस्तामुळे पोलिसांवर ताण आला आहे, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली होती. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी झालेल्या चर्चेत हा मुद्दा उपस्थित केला होता.

महत्त्वाच्या बातम्या 

’20 लाख कोटी रुपयांच्या जाहीर केलेल्या महापॅकेजचे जनता स्वागत करीत आहे ‘

उदगीर : कोरोनाबाधित रुग्णांची तब्येत चांगले असल्याने 19 मे पर्यंत सर्वांना घरी सोडण्यात येणार

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!