🕒 1 min read
मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील वि.स.पागे संसदीय प्रशिक्षण केंद्रातर्फे आमदारांसाठी ‘राज्याचा अर्थसंकल्प-माझ्या मतदारसंघाच्या संदर्भात’ ही दोन दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. यावेळी बोलत असतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या मदती संदर्भात आपली भूमिका मांडली.
यासंदर्भात बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की,’पावसाची सुरुवात आपल्याकडे चक्रीवादळाने होते. प्रत्येकवेळी पंचनामे होतात. नुकसानभरपाई कशी होते ? तात्काळ मदत करावी लागते. मी खोटं बोलणार नाही. लोकांना धीर देताना उगीच काहीही बोलायचं नसतं. माझ्यावर टीका झाली तरी चालेल.’ तसेच तुम्ही सभागृहात जे बोलता ते केले नाही तर लोक तुम्हाला घरी बसवतील. तुमची सभागृहातील वागणूक आणि संसदीय भाषा याचे भान असले पाहिजे. परंतु आता उथळपणा अधिक असतो. कोणाच्या शिक्षणाचा प्रश्न नाही पण किमान नीट बोलता आलं पाहिजे’ असेही ते म्हणाले.
तसेच पुढे ते म्हणाले की,’काल राज्यातील शाळेची घंटा वाजली आणि आज आपला वर्ग भरला. सभापती आणि उप सभापती यांनी थोड गुरुजीसारख वागावं लागेल. मी विधान परिषदेचा, त्यात मुख्यमंत्री आणि माझा मतदारसंघ हे संपूर्ण राज्य. मला दिवाळीतील ठिपक्यांची रांगोळी आठवते, ठिपक्या जोडल्या की एक परिपूर्ण रांगोळी होते. तसेच सर्व मतदारसंघ जोडून राज्य उभं राहतं.’
दरम्यान, ‘आता या ठिकाणी आजी माजी…माजी सदस्य नाहीत. अर्थसंकल्पात साधू संत यांचे दाखले द्यायचे आणि शेरो शायरी करायची हे बरोबर नाही. एखादा विषय मांडला, भूमिका मांडली तर मत व्यक्त केले पाहिजे. तुमच्या वागणुकीकडे लोकांचे लक्ष असते. एखाद्या विषयावरून सभेत गोंधळघालायचा, आरडाओरडा करायची हे योग्य नाही, या संदर्भात मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी देखील बोललो. तसेच जगात कुठेही नसेल तेवढी आरोग्य सुविधा आपण गेल्या दीड वर्षात वाढवली आहे. याचा आकडा समोर आला पाहिजे. इतर गोष्टींचा निधी आरोग्य सुविधांकडे वळवावे लागले’ असेही यावेळी ठाकरेंनी नमूद केले.
महत्वाच्या बातम्या
- ‘निवृत्त नव्हे तर सुप्रीम कोर्टाच्या न्यायमूर्तींमार्फत लखीमपूर घटनेची चौकशी करा’
- ‘निवडणूक आचारसंहितेचे कारण न दाखवता मराठवाड्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत करा’
- “मुंबईत अंमली पदार्थांची तस्करी होत असताना महाराष्ट्राचे गृहमंत्री झोपले आहेत काय?”
- भाजपा हा पक्ष शिवसैनिकांसाठी मावशीसारखा आहे – सुभाष साबणे
- शासकीय सेवेतील पती-पत्नीवरील अन्याय दूर करा; यशोमती ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
