पुणे : कोल्हापूरचे माजी खासदार धनंजय महाडिक यांचे ज्येष्ठ सुपुत्र पृथ्वीराज महाडिक यांचा रविवारी (दि. २१ फेब्रुवारी) रोजी शाही पद्धतीने विवाह संपन्न झाला. एकीकडे कोरोना वेगाने वाढत असताना जनसामन्यांच्या कार्यक्रमांवर कडक निर्बंध आले असताना परवानगी पेक्षा जास्त लोक या विवाह सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे निदर्शनास आले होते.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी या विवाह सोहळ्याला उपस्थिती लावली होती. पुण्यातील मगरपट्टा सिटीतल्या लक्ष्मी लॉन्समध्ये पार पडललेल्या या विवाह सोहळ्यास तुफान गर्दी झाली होती.
मास्कसह, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांना हरताळ फासले गेल्याचे समोर आले आहे. यावरून लॉन्स चालकाला नोटीस बजावण्यात आली होती. आता याच प्रकरणी धनंजय महाडिक यांच्यासह तीन जणांवर हडपसर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मी लॉन्सच्या मालक आणि मॅनेजर विरोधातही गुन्हा दाखल दरम्यान, कोरोनाचे नियम उल्लंघन केल्याप्रकरणी कोल्हापुरचे माजी खासदार धनंजय महाडिक, लक्ष्मी लॉन्सचे मालक विवेक मगर आणि लॉन्सचे मॅनेजर निरुपल केदार या तिघांविरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
राष्ट्रीय आपत्कालीन प्रशासन अधिनियम २००५ कलम ५१ आणि महाराष्ट्र कोव्हिड धोरण योजना २०२० च्या कलम ११ अंतर्गत आयपीसी १८८, २६९, २७१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजप व्हाया राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना असा राजकीय प्रवास केलेल्या महाडिकांचा राजकीय क्षेत्रातील मित्र परिवार देखील मोठा आहे.
महत्वाच्या बातम्या
- सरकारने आरक्षणाविषयी भक्कमपणे कोर्टात बाजू मांडावी; खा. संभाजीराजेंचे साष्टपिंपळगावात प्रतिपादन
- परभणीतून अमरावतीला जाणाऱ्या बस बंद; जिल्ह्यात सोमवारी २२ नव्या रुग्णांची भर
- निदान कोरोना संकटात जपून वागा, बोला राजकारण करायला उभा जन्म आहे’
- युवकाची गळफास घेवून आत्महत्या
- मुख्यमंत्र्यांनी आंदोलनावर बंदी घालण्याच्या २४ तासांतच काँग्रेसचे आंदोलन
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
