Share

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने मागितली टीम इंडियाची माफी; त्या’ प्रेक्षकांवर होणार कारवाई

Published On: 

🕒 1 min read

ऑस्ट्रेलिया : भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटीच्या चौथ्या दिवशी प्रेक्षकांनी असभ्य वर्तनाचे पुन्हा दर्शन घडवले. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या मोहम्मद सिराजला वर्णद्वेषी टीकेचा सामना करावा लागला आणि त्यानं थेट पंचांकडे तक्रार केली. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेनंही आक्रमक पवित्रा घेताना कारवाईची मागणी केली. त्यामुळे लगेच पोलिसांना बोलावण्यात आले आणि सहा प्रेक्षकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले गेले. क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही प्रसिद्धी पत्रक काढून घडलेल्या प्रकाराबद्दल टीम इंडियाची माफी मागितली.

ऑस्ट्रेलिया व टीम इंडियामधील तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी काही ऑस्ट्रेलियन चाहत्यांनी भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराज व जसप्रीत बुमराहवर वर्णभेदी टीका केली होती. याबाबत भारतीय संघाने सामनाधिकारी डेविड बून यांच्याकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणामुळे २००७-०८ मध्ये सिडनी येथेच झालेल्या ‘मंकीगेट’ प्रकरणाच्या आठवणी ताज्या झाल्या.

सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होत असलेल्या या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी एका चाहत्याने सिराजला मंकी (माकड) म्हणून संबोधले. ‘जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज या दोन भारतीय खेळाडूंवर एका मद्यप्राशन केलेल्या चाहत्याने वर्णद्वेषी टीका केली. बीसीसीआयने याबाबत आयसीसीचे सामनाधिकारी डेविड बून यांच्याकडे अधिकृत तक्रार दाखल केली आहे,’ असे बीसीसीआयच्या सूत्रांकडून सांगण्यात आले. यावेळी कर्णधार अजिंक्य रहाणेही भडकला आणि त्यानं त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. रहाणेच्या आक्रमकतेनंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले आणि सिराजनं सांगितलेल्या स्टँडमधून सहा प्रेक्षकांना बाहेर पाठवण्यात आले.

क्रिकेट ऑस्ट्रेलियानंही टीम इंडियाची माफी मागितली. त्यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले की,’अशा प्रकारची वागणूक खपवून घेतली जाणार नाही. दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद याचा तपास करत आहे आणि दोषी प्रेक्षकाची ओखळ पटल्यानंतर त्याच्यावर कारवाई करण्यात येईल. त्याच्यावर आजीवन बंदी घातली जाईल. CCTV फुटेजची पाहणी केली जात आहे.”

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!