Share

वूहान येथे प्रयोग करतानाचं कोरोना विषाणूची झाली निर्मिती, जगप्रसिद्ध शास्त्रज्ञाने केला खुलासा

Published On: 

अंतरराष्ट्रीय : वूहान येथे प्रयोग करतानाचं कोरोना विषाणूची निर्मिती झाली असल्याचा मोठा खुलासा जगप्रसिद्ध मायक्रोबायोलॉजिस्ट पीटर चुमाकोव यांनी केला आहे. चीन आज टीकेच्या केंद्रस्थानी असताना पीटर चुमाकोव यांनी हे मोठे वक्तव्य केले आहे. या बाबतचे वृत्त दै. लोकसत्ताने प्रसिद्ध केले आहे.

त्यात चुमाकोव म्हणाले की,चीनमधील वुहान येथील प्रयोगशाळेमध्ये वैज्ञानिक मागील दहा वर्षांपासून वेगवेगळ्या प्रकारच्या करोना विषाणुंची निर्मिती करत होते. विषाणुची निर्मिती करण्याचा त्यांच्या उद्देश नव्हता मात्र हा विषाणू रोग किती प्रमाणात पसरवू शकतो याबद्दल ते संशोधन करत होते. त्यामधूनच या विषाणुची निर्मिती झाली

चीनी वैज्ञानिकांनी वेडेपणा म्हणता येईल असे काही प्रयोग केले. उदाहरण द्यायचे झाले तर त्यांनी या विषाणुमध्ये जीनोम टाकला त्यामुळे या विषाणूला मानवाच्या पेशींना संक्रमण करण्याची क्षमता प्राप्त झाली. आता या सर्व गोष्टींचे विश्लेषण केले जात आहे. करोनाची निर्मिती कशी झाली याबद्दलचे चित्र आता हळूहळू स्पष्ट होत आहे.

चीनी वैज्ञानिकांनी या विषाणुमध्ये अनेक गोष्टी टाकल्या त्या गोष्टी विषाणुच्या जीनोमचा भाग झाल्या. त्यामुळेच या विषाणुमध्ये अनेक वेगळ्या गोष्टी अढळून येत आहेत. या विषाणुच्या निर्मितीची गोष्ट लोकांसमोर हळूहळू येत असल्याबद्दल मला आश्चर्य वाटत आहे,” असं चुमकोव यांनी सांगितले.

याबाबत चौकशी केली जाईल ज्यानंतर एखाद्या विषाणुमधील जीनोमवर नियंत्रण ठेवण्याचे नियम तयार केले जातील. सध्या या विषाणुच्या निर्मितीसाठी कोणालाही थेट दोषी ठरवता येणार नाही,” असं चुमकोव यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कोरोनाने जगात बऱ्या पैकी हात पाय पसरवले आहेत. जगभरातील १८० हून अधिक देशामध्ये करोनाचा प्रादुर्भाव झाला आहे. अनेक देश करोनाच्या संकटाशी झुंज देत आहेत. रशियालाही करोनाचा चांगला फटका बसला आहे. रशियामध्ये शुक्रवारी (२४ एप्रिल २०२०) दुपारी १२ वाजेपर्यंत ५५० हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून संसर्ग झालेल्यांची संख्या ६२ हजारच्या वर गेली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!