नवी दिल्ली : कोरोनाच्या संसर्गाबाबतची सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. कोरोनाने आता राष्ट्रपती भवनातही एन्ट्री केली आहे. राष्ट्रपती भवन परिसरात काम करणाऱ्या एका व्यक्तीमध्ये कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. त्यानंतर या परिसरातील जवळपास 100 कुटुंब सेल्फ क्वॉरंन्टाईन करण्यात आली आहेत.
समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या मुख्य इमारतीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं कुटुंब राहतं, तिथे मात्र कोरोनाचा कुठलाही धोका पोहचलेला नाही. मात्र प्रेसिडेन्शियल इस्टेट मधील संपूर्ण परिसराची देखभाल करण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रातले कर्मचारी या परिसरातच राहतात. त्यांच्यापैकी एकाला कोरोनाची लागण झाली असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर खबरदारी म्हणून या परिसरातल्या 100 कुटुंबांचं विलगीकरण करण्यात आलं आहे.
तसेच याआधीही कोरोना राष्ट्रपती भवनापर्यंत पोहचला होता. कोरोनाबाधित गायिका कनिका कपूर यांच्या संपर्कात भाजपचे खासदार दुष्यंत सिंह हे आले होते. त्यानंतर त्यांनी राष्ट्रपती भवनात जाऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती. त्यावेळी हे राष्ट्रपती भवन हे हायअलर्टवर होते.
दरम्यान सध्या मुख्य इमारतीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचं कुटुंब राहतं ती जागा सुरक्षित आहे. तर आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या गाईडलाईन्सनुसार, राष्ट्रपतींनी खबरदारी म्हणून प्रोटोकॉलचं पालन करत विलगीकरण केलं होतं. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राज्यपालांसोबत होणाऱ्या काही भेटीगाठीही व्हिडिओ कॉन्फरन्सच्याच माध्यमातून होत आहेत.
मारुती कंपनीच्या कार महागल्या, खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

