मुंबई : दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. प्रामुख्याने मुंबई व पुणे या दोन मोठ्या आणि महत्त्वाच्या शहरांना कोरोना विषाणूने चांगलाच विळखा घातला आहे. तसेच दुसरीकडे मात्र कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु आहे.
तसेच कोरोनावर नियंत्रण मिळविण्यात दक्षीण कोरियाला मोठे यश मिळाले आहे. याबाबत बोलताना संयुक्त राष्ट्रंचे प्रमुख अँटोनिओ गुटेरेस म्हणाले की, ‘जगातील अनेक देश कोरोनाचा सामना करण्यासाठी दक्षीण कोरियाने केलेल्या उपाय योजनांचा अवलंब करतील, असे ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘दक्षीण कोरियाप्रमाणे, कोरोनाचा समना करण्याबरोबरच हवामान बदलामुळे होणारे नुकसानही करमी करण्यावर विचार करावा लागेल.
दरम्यान, ‘दक्षीण कोरियाने नुकतीच एक महत्वकांक्षी ‘हरित योजना’ सादर केली आहे. यात कोळशावर चालणाऱ्या नव्या यंत्रांवर जेथे बंदी घालण्यात आली आहे, तेथे असलेल्या यंत्रांमधून होणारे उत्सर्जन कमी करण्यावरही यात उपाय योजना आहेत,’ असं गुटेरेस यांनी सांगितले.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

