🕒 1 min read
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त सर्व दुकांनं बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच जे आदेश पाळणार नाही त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाईही केली जात आहे.देश अभूतपूर्व अश्या संकटाचा सामना करत आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांमध्ये विदेशातून आलेल्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेने मागील काही दिवसांपूर्वी परदेशात दौरा करून भारतात आलेल्या नागरिकांची एक यादी तयार केली आहे. यासाठी एअरपोर्ट अथॉरिटी आणि टुरिस्ट कंपन्यांची मदत घेतली आहे. ही संख्या 10 हजाराच्या आसपास असल्याचे समोर आले आहे. ABP माझा ने या संदर्भात वृत्त दिले आहे.
दरम्यान,अशा नागरिकांच्या घरी महानगरपालिकेचे अधिकारी स्वतः जाऊन त्यांच्या घरावर होम होम क्वॉरन्टाईनचे बोर्ड चिकटवत आहेत. शिवाय त्या घराच्या आसपास राहणाऱ्या कुटुंबियांना त्यांच्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले जात आहेत. जेणेकरून हे कुटुंबिय घराबाहेर पडू नये. त्यामुळे परदेश दौरा करून आलेल्याना सध्या अशाप्रकारे घरातच थांबविण्यात येत आहे. अशा कुटुंबियांच्या शेजारी राहणारे या नागरिकांना मदत करताना दिसत आहेत. फळ, भाज्या, दूध, किराणा सामान आणून यांच्या दरवाज्यासमोर ठेवण्यात येत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
