Share

मातृ-पितृ पूजनाच्या कार्यक्रमातही दिसली मनपाची तयारी

Published On: 

औरंगाबाद : शिवसेनेच्या वतीने १४ फेब्रुवारी रोजी व्हॅलेटाईन डेच्या दिवशी मागील पाच वर्षांपासून मातृपितृ पूजन करण्यात येते. यंदा मात्र महानगर पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शनिवारी कवितेची बाग, ज्योती नगर येथे हा कार्यक्रम घेण्यात आला. दरम्यान परिसरातील ज्येष्ठ नागरिक तसेच तरुण मंडळींना पूजनासाठी बोलावले. यामध्ये परिसरातील वेगवेगळ्या वार्डामधील इच्छूकांनी मात्र खुप हिरीरिने सहभाग नोंदवत जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांना मात्र आपणही निवडणूकीसाठी तयार असल्याचे दाखवून दिले.

येथील जुने जानते ज्येष्ठ शिवसैनिक तसेच माजी नगरसेवक गिरीजाराम हळनोर, बाळासाहेब थोरात यांच्यासह परिसरातील शिवसेनेचे मोठे नेते खुप उत्साही देखील दिसले. यातच राज्यामध्ये आता तिन्ही पक्षांचे सरकार अस्तित्वात आहे. आता त्यामुळे प्रत्येक वार्डामध्ये शिवसेनेला खुप मोठ्या नेटवर्कची गरज भासणार हे मात्र नक्की. कारण आत्तापर्यंत २५ वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षासोबत महानगर पालिका निवडणूकीमध्ये समान सहभाग होता. परंतू आता काँग्रेसने देखील पूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याचे अनेकवेळा जाहिर केले आहे. त्यामुळे शिवसेना तसेच इतर सर्व पक्ष जनतेमध्ये जाण्यासाठी संधीच शोधताना दिसत आहे. याचा प्रत्यय आपणास शुक्रवारी मंत्री एकनाथ शिंदे यांच्या सर्व उद्घाटनामधील कार्यक्रमात प्रामुख्याने दिसून आले.

माता पित्यांना घरातून ने-आणची जबाबदारी दिली कार्यकर्त्यांना
माता-पित्यांच्या पूजनासाठी ज्योतीनगर तसेच आजुबाजुच्या वार्डामधून कार्यकर्ते निमंत्रित पालकांना आणण्याची जबाबदारी येथील इच्छुक उमेदवारांनी पार पाडली. यावेळी अनेक पालकांना चालणेही मुश्कील होते. अशांना देखील येथे आणण्यात आले. या माध्यमातून अंबादास दानवे यांच्याकडे राजकीय वजन वाढवण्याची संधीचे सोने मात्र काही कार्यकर्त्यांनी करून घेतले.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!