Share

#Corona : भारतातील कोरोना विषाणू 20 मेपर्यंत नष्ट होऊ शकतो, ‘या’ संस्थेने केला दावा

Published On: 

नवी दिल्ली : अनेक देशांमध्ये कोरोनाने आपले हात पाय चांगलेचं पसरवले आहेत. आता पर्यंत जगातील कोरोनाबाधितांचा आकडा हा 29 लाखांवर पोहचला आहे. त्यात भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असून ही  संख्या आता 26हजार 496 वर पोहोचली आहे.

त्यात आता सिंघापूर यूनिवर्सिटी ऑफ टेक्नोलॉजी अॅण्ड डिजाइन  या संस्थेने भारतातील कोरोनाबाबत एक अंदाज व्यक्त केला आहे. भारतातील कोरोना विषाणू हा 20 मे पर्यंत नष्ट   होईल, असे भाकीत या संस्थेने केले  आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मदतीनं आकडेवारीचंजे विश्लेषण केलं आहे त्यानंतर हा दावा करण्यात आला आहे. भारतातून 20 मेपर्यंत कोरोनाचा नाश होईल तर वेगवेगळ्या देशांमध्ये लवकरच या व्हायरसचा नाश होईल असं सांगण्यात आलं आहे.

त्याचबरोबर केंद्र सरकारने 3 मे पर्यंत वाढवलेला लॉकडाऊनचा काळ हा जर 16  मे पर्यंत वाढवला तर  कोरोनावर बऱ्या पैकी नियंत्रण मिळवता येईल, असे केंद्र सरकारकडून सांगण्यात येत आहे. देशात कोरोनाबाधित असणारे अनेक रुग्ण आता बरे होऊ लागले आहेत. तर मृत्यूच्या दारातही घट झाली आहे. त्यामुळे भारत कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी होत आहे, असे आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.

दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार भारतात मागच्या 24 तासांमध्ये 1990 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर 41 जणांचा मृत्यू झाला आहे. देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा 26 हजारवर पोहोचला आहे. तर आतापर्यंत देशात 824 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे आतापर्यंत 5 हजार 803 रुग्णांना कोरोनावर यशस्वीपणे मात दिली आहे.

मारुती कंपनीच्या कार महागल्या, खरेदीसाठी मोजावे लागणार ‘इतके’ रुपये

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!