Share

#Corona_attack : नौदलात कोरोनाची लागण, INS आंग्रेवरील 19जण पॉझिटिव्ह

Published On: 

मुंबई : कोरोनाचा संसर्ग आता नौदलातील जवानांपर्यंत पोहचला आहे. वेस्टर्न नेव्हल कमांडच्या किनाऱ्यावर असलेल्या लॉजिस्टिक अँड अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव सपोर्ट बेस INS आंग्रेवर 19 जवान कोरोना पॉझिटिव्ह सापडल्याचे सांगण्यात येत आहे. INS आंग्रे ही नौका सध्या मुंबईच्या बंदरावर आहे.

INS आंग्रे येथे सापडलेल्या सर्व 19 कोरोना पॉझिटिव्ह जवानांना  नेवल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. नौदलामध्ये कोरोना संसर्गाची ही पहिली घटना आहे. कोरोनाबाबत पॉझिटिव्ह घटना घडल्यानंतर आता या बाधित सैनिकांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे. हे सर्व सैनिक आयएनएस आंग्रेमध्ये बांधलेल्या त्यांच्या खोल्यांमध्ये राहत होते.

मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाऊनमुळे हे सैनिक त्यांच्या घरीच होते आणि बाहेरील कोणाशीही त्यांचा संपर्क झाला नाही हे आतापर्यंतच्या तपासात उघड झाले आहे.  तरीदेखील त्यांना कोरोनाची लागण झाली  आहे.

दरम्यान नौदलात कोरोनाची लागण झाल्याची ही पहिलीच घटना आहे. सध्या नौदलाकडून मोठ्या प्रमाणात मोहीम राबवून या संक्रमित लोकांच्या संपर्कात कोण आले याचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. तर उरलेल्यांनी खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.

‘या’ कायद्याचं पालन केलं नाही तर, कायद्यापलीकडे कोणालाही क्षमा केली जाणार नाही

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!