Share

#Coronavirus : महाराष्ट्रात कोरोना बाधितांचा आकडा वाढला

Published On: 

मुंबई : आणखी दोन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. मुंबई आणि उल्हासनगरमधील प्रत्येकी एका महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा 47 वर पोहोचला आहे.

मुंबईमध्ये 22 वर्षांची तरुणी कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. ती युरोपमधून भारतात दाखल झाली होती. तर दुसरी पॉझिटिव्ह महिला 49 वर्षांची असून उल्हासनगरची आहे. ही महिला दुबईवरून भारतात आली होती.

काल रत्नागिरीत नवा कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. त्यामुळे राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचं दिसत आहे. पुणे, मुंबई, यवतमाळ, औरंगाबाद, नागपूर, कल्याण या ठिकाणी कोरोनाचे रुग्णांमध्ये वाढ होत आहे. नुकतंच रत्नागिरीत कोरोनाचा एक रुग्ण आढळला आहे.

दरम्यान, राज्यात कोरोना व्हायरस संशयितांचे नमुने जलद गतीने तपासले जाण्यासाठी येत्या 15 दिवसांत आठ ठिकाणी नवीन तपासणी लॅब सुरु करणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी दिली.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!