🕒 1 min read
मुंबई : ‘कोरोना’ विषाणूचा वाढता प्रभाव केंद्र सरकारने लॉकडाऊनमध्ये दोन आठवड्यांची वाढ केली आहे. त्यामुळे तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन हा 3 मे पासून 17मे पर्यंत वाढविण्यात आला आहे. येत्या 17 मे पर्यंत हा लाॅकडाऊन लागू राहणार आहे. ग्रीन आणि आॅरेंज झोनसाठी काही सवलतींची घोषणा करण्यात आली आहे.
मात्र असं असतानाही विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांची संख्याही जास्तच आहे. असा लोकांवर पोलिस कारवाई केली करत आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद करण्यात आले आहेत. तरीही रस्त्यावर येणाऱ्यांची संख्या कमी होतानाचे चित्र दिसत नाही. तसेच सतत प्रशासनाकडून बाहेर पडू नका, आहेत तिथेच थांबा, विनाकारण गर्दी करू नका, काळजी घ्या असं आवाहन केलं जात आहे. मात्र तरीदेखील नागरिकांचे घराबाहेर पडण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे.
दोघेही आपापल्या सिनेमांचे हिरो आहेत. तुम्ही तुमच्या सिनेमाचे व्हा- जी काही 'गम्मत जम्मत' आहे ती लॉकडाऊन संपल्यावर करा.#StayHome #StaySafe pic.twitter.com/GkBc5KkBvM
— महाराष्ट्र पोलीस – Maharashtra Police (@DGPMaharashtra) May 2, 2020
याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र पोलिसांनी थेट अशोक मामा आणि ‘नाळ’मधील चैत्याची मदत घेतली आहे. या दोघांचा एक मजेदार फोटो ट्विट करत पोलिसांनी तुम्हीच तुमच्या सिनेमाचे हिरो व्हा असं सांगत घरातच थांबण्याचे आवाहन केलं आहे.
दरम्यान, ‘दोघेही आपापल्या सिनेमांचे हिरो आहेत. तुम्ही तुमच्या सिनेमाचे व्हा- जी काही ‘गम्मत जम्मत’ आहे ती लॉकडाऊन संपल्यावर करा,’ अशी कॅप्शन देत महाराष्ट्र पोलिसांनी एक फोटो ट्विट केला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

