Share

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे ‘ते’ शब्द ऐकून समाधान वाटले

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : राज्यात कोरोनाचा हाहाकार मजला आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे हे सतत जनतेशी संवाद साधत आहे. कोरोनाविषयी माहिती, याचप्रमाणे नागरिकांच्या मनातील भीती मुख्यमंत्री ठाकरे हे घालवत असतात.

याचाच धागा पकडत गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी देखील मुख्यमंत्री ठाकरे यांचे कौतुक केलं आहे. काल (गुरुवारी) जनतेला संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, ‘ लोकांना लक्षमं दिसली तर अंगावर काढू नका असं आवाहन करताना करोनाचा रुग्ण लवकर आला तर लवकर बरा होतो’.

याच पार्श्वभूमीवर लतादीदींनी ट्विटकरत म्हंटलं आहे की, ‘नमस्कार…महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी आणि समस्त ठाकरे परिवार व त्यांचे सर्व सहकारी यांना महाराष्ट्र दिनाच्या अनेक शुभेच्छा. आज उद्धवजींनी सांगितले की, या आजारातून वेगवेगळ्या वयोगटातले अनेक लोक बरे होत आहेत, हे ऐकुन समाधान वाटले.’

वाचा नेमकं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?

आजही ७५ ते ८० टक्के रुग्णांमध्ये कोरानाची सौम्य, अतिसौम्य लक्षणे आहेत किंवा लक्षणेच दिसत नाहीत. असे असले तरी आपण या सर्वांना विलगीकरण कक्षात दाखल करत आहोत. मुंबई महापालिका ऑक्सीमीटरच्या सहाय्याने घरोघरी जाऊन तपासण्या करत आहे. आतापर्यंत २ लाखाहून अधिक तपासण्या झाल्या, ज्यात २७२ लोकांमध्ये ऑक्सीजनची कमी आणि इतर विकार असलेले रुग्ण सापडले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!