मुंबई : महाराष्ट्रात शनिवारी (काल) आणखी पाच कोरोना संशयित पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे देशात सध्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 96 वरुन 101 वर पोहोचली आहे. भारतात कोरोनाबाधितांची संख्या 100 च्यावर पोहोचली आहे.
तसेच राज्यात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 31 वर पोहोचली आहे. आणखी पाचजणांचे रिपोर्ट सकारात्मक आल्याने महाराष्ट्रातल्या करोनाग्रस्तांची संख्या ही २६ वरुन थेट ३१ वर पोहचली आहे.
याचप्रमाणे शुक्रवारी ही संख्या १८ ते १९ च्या घरात होती. मात्र एका दिवसात महाराष्ट्रात करोनाग्रस्तांची संख्याही १० ते ११ न वाढली आहे. तर दुसरीकडे देशभरात करोनाचे ८५ पेक्षा जास्त रुग्ण आहेत. मात्र चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रात हा आकडा ३१ वर गेला आहे.
दरम्यान, पिंपरी चिंचवड शहरातून दुबईला गेलेल्या तिघांचे रिपोर्ट गुरुवारी पॉझिटिव्ह आले होते. त्यातील एकाच्या कुटुंबातील चार जण आणि परदेशवारी केलेल्या एक अशा पाचजांचे रिपोर्ट शनिवारी रात्री पॉसझिटिव्ह आले आहेत. पिंपरी चिंंचवडमधले हे पाच रुग्ण आहेत. या पाचजणांमध्ये तीन महिला आणि दोन पुरुषांचा समावेश आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

