विवेक पोटफोडे : राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा हा १० हजारांच्या पुढे गेला आहे. त्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जारी केलेला लॉकडाऊन ३ मेला संपणार आहे. त्या आधीच आज (१ मे) महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधला. यात त्यांनी राज्यात जे झोन तयार केले आहेत त्यानुसार लॉकडाऊनमध्ये हळूहळू शिथिलता येईल असे सांगितले. केंद्र सरकारने जारी केलेल्या झोन्सची यादी पाहूयात.
रेड झोन – या झोनमधील कोणत्याही जिल्ह्यात इतक्यात निर्बंध हटवले जाणार नाहीत. यात मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, पालघर, नागपूर, सोलापूर, यवतमाळ, औरंगाबाद, सातारा, धुळे, अकोला, जळगाव, मुंबई उपनगराचा समावेश आहे.
ऑरेंज झोन – या भागातील निर्बंध काही अंशी शिथिल करण्यात येणार आहेत. रायगड, अहमदनगर, अमरावती, बुलढाणा, नंदुरबार, कोल्हापूर, हिंगोली, रत्नागिरी, जालना, नांदेड, परभणी, सांगली, लातूर, भंडारा, बीड या जिल्ह्यांचा या झोनमध्ये समावेश आहे.
ग्रीन झोन – या भागात लॉकडाऊनचे नियम पुर्णपणे शिथिल करणार मात्र तरीही जास्त गर्दी करण्यास मनाई असणार आहे. आणि जर नियम मोडले तर पुन्हा निर्बंध लागू करणार. यात उस्मानाबाद, वाशिम, सिंधुदुर्ग, गोंदिया, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यांचा समावेश आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

