मुंबई : देशासह राज्यात कोरोनाने चांगलेच हात पाय पसरले आहेत. मंगळवारी महाराष्ट्रात एका दिवसात ७२९ नवे रुग्ण सापडले. यानंतर महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची एकूण संख्या ९ हजार ३१८ झाली आहे. केवळ मुंबईत करोनाग्रस्तांचा आकडा ५ हजार ९८२ वर पोहोचला आहे. मंगळवारी मुंबईत करोनाचे ३९३ नवे रुग्ण सापडले.
मंगळवारी २४ तासांत १०६ रुग्णांना दवाखान्यातून सुट्टी देण्यात आली आहे. तर आत्तापर्यंत १३८८ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनामुळे ३१ जणांचा मृत्यू झाला असून आत्तापर्यंत ४०० जण मृत्युमुखी पडले आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली.
तसेच मृतांच्या संख्येत आणखी २५ जणांची भर पडली आहे. गेल्या २४ तासात करोनाचे २० रुग्ण दगावले आहेत. तर २३ ते २५ एप्रिल दरम्यान ५ मृतांची नोंद आजच्या आकडेवारीत करण्यात आली आहे. मुंबईतल्या धारावीत आज ४२ नवे रुग्ण सापडले. तर चार करोना बाधितांचा मृत्यू झाला. धारावीतील करोनाबाधितांची संख्या आता ३३० झाली आहे तर आत्तापर्यंत मुंबईतल्या धारावीत १८ जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 212,69 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3,087,105 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
