Share

‘पोलिसांचे मनोबल खचल्यास कोरोनोची परिस्थिती हाताळणे अवघड होईल’

Published On: 

🕒 1 min read

मुंबई – कोरोनोच्या संकटात महाराष्ट्र सापडला आहे. कोरोना सारख्या कठिण परिस्थितीत कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलिस बांधव दिवस रात्र करित आहेत. पण कर्तव्यावर असणा-या पोलिसांवर गेल्या काही दिवसात हल्ले होण्याचे प्रमाण वाढत आहे. पोलिसांवर असे हल्ले वाढत गेल्यास कोरोनोची परिस्थिती हाताळणे अवघड होईल असा इशारा विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी आज दिला.

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या प्रवृत्तीला ठेचून काढायला हवे आणि पोलिसांना आता अशा प्रवृत्तीपासून संरक्षण करण्याची वेळ आली आहे, त्यामुळे आता गृहखाते पोलिसांवरील हल्ले रोखण्यासाठी काय करणार असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे उपस्थित केला आहे.

नाशिक,मानर्खुद भिवंडी, पैठण येथील पोलिसांवरील हल्ल्यांच्या घटना पुन्हा एकदा गृहखात्याचा नाकर्तेपणा सिद्ध करणाऱ्या आहेत. कोरोनाच्या लढाईत दिवसरात्र कर्तव्य बजाविणा-या १५९ पोलिसांवर आतापर्यंत हल्ले झाले आहेत. हल्लेखोर विशिष्ट प्रवृतीचे असल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे अशा हल्याने पोलिसांचे मनोबल खचल्यास कोरोनाग्रस्त परिस्थिती हाताळता येणार नाही त्यामुळे राज्याचे गृहमंत्री आता पोलिंसांवर हल्ला करणा-या या प्रवृत्तींना आळा कसा घालणार व पोलिसांचे रक्षण कसे करणार असा सवाल दरेकर यांनी उपस्थित केला आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!