टीम महाराष्ट्र देशा – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनचा कालावधी १४ एप्रिल वरून ३ मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. यामुळे दूरसंचार कंपन्यांनी आपल्या ग्राहकांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.
ज्या प्रीपेड ग्राहकांना आपला मोबाईल रिचार्ज करता आला नाही त्यांच्या मोबाईल क्रमांकाची वैधता ३ मे पर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडिया या कंपन्यांनी याबाबत घोषणा केली आहे.
या आधी तिन्ही कंपन्यांनी दुसऱ्या ग्राहकाचं रिचार्ज केल्यानंतर त्यावर कमिशनची सुविधा देण्याचाही निर्णय घेतला होता. डिजिटल माध्यमांचा वापर करून तसंच काही ठिकाणी कंपनीची एटीएम, टपाल खातं किंवा अन्य ठिकाणी करण्यात आलेल्या व्यवस्थेच्या माध्यमातून काही ग्राहकांनी आतापर्यंत रिचार्ज केले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत 3 कोटी ग्राहकांना रिचार्ज करता आलं नाही. त्यामुळे त्यांची वैधता 3 मे पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती भारती एअरटेलकडून देण्यात आली आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

