Share

देशभरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी पुरवणार बेड्स

Published On: 

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मुंबईत देखील एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात दररोज दहा हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात येत होती. यामुळे, रुग्णालयांमध्ये बेड्स, ऑक्सिजन, औषधे यांचा मोठा तुटवडा निर्माण झाला होता.

देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात देखील आरोग्य व्यवस्था अपुऱ्या पडत असून मागील लाटेपेक्षा यंदा स्थिती गंभीर झाली आहे. अनेक रुग्णांना प्राण गमवावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत अनेक क्रिकेटपटू मदतीसाठी धावून आले. यातच टीम इंडियाचा माजी ऑल राऊंडर युवराज सिंह सुद्धा कोरोना संकटात गरजूंच्या मदतीसाठी पुढे आला आहे.

युवराजनं त्याच्या युवीकॅन (YouWeCan) फाऊंडेशनच्या माध्यमातून मदतीची घोषणा केली आहे. या माध्यमातून देशभरातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी 1000 बेड्सची सुविधा देण्यात येणार आहे. युवराजच्या फाऊंडेशननं वन डिजिटल एन्टरटेन्मेंटच्या सहकार्यानं ही योजना सुरू केली आहे.

कोरोना रुग्णांना ऑक्सिजनसह बेड्स, व्हेंटीलेटर तसंच उपचारासाठी अन्य सर्व वैद्यकीय उपकरणं देण्याचा निर्णय युवराजनं घेतला आहे. सरकारी, खासगी, धर्मदाय आणि लष्करी हॉस्पिटलमधील वैद्यकीय सेवांना हातभार लावण्याचा या योजनेचा उद्देश आहे.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!