Share

परभणीमध्ये कोरोना प्रतिबंध लस दोन दिवसात मिळणार : जिल्हाधिकारी

Published On: 

परभणी: कोरोनावरील प्रभावी ठरणाऱ्या व्हॅक्सीनचा (लस) साठा येत्या दोन दिवसात जिल्ह्यास मिळणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलकांना दिली आहे. कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाने संपूर्ण जिल्ह्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. एकीकडे कोरोनाचे रुग्ण खुप मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. तर आता लसीचा तुटवडा असल्याने परभणीकर चिंतेत पडले आहेत.

दुसरीकडे लसीचा साठा संपत चालता आहे. त्यामुळेच परभणीकरांची चिंता वाढली आहे. लसीचा साठा लवकरच मिळावा तसेच लसीकरण पुन्हा लवकर सुरु व्हावे, या दृष्टीकोनातून जिल्हा प्रशासन युद्धपातळीवर प्रयत्न करणे सुरू केले आहे. लसीच्या साठ्याची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्या पाठोपाठ आरोग्य विभागाच्या संचालकांबरोबर जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी संवाद देखील साधला आहे. ही स्थिती निदर्शनास आणूण दिली. जिल्ह्यामध्ये आवश्यक तेवढी लस निश्चित पूरवावी अशी आशा देखील जिल्हाधिकारी मुगळीकर यांनी या वेळी व्यक्त केली आहे.

दरम्यान शनिवारी दिवसभर लसीकरण व्यवस्थित झाले. मिळालेली लस संपली आहे. त्यामुळे लसीकरणात अडथळा आला आहे. आपण लसीच्या साठ्याबाबत मागणी केलेली आहे. त्यासाठी पाठपुरावाही देखील सुरू करण्यात आला आहे. तो साठा मंगळवारपर्यंत मिळणार आहे. हा साठा मोठ्या प्रमाणात मिळणार असल्याचे देखील जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. दरम्यान, यापूर्वी परभणी जिल्ह्याकरिता १ लाख ४ हजार लसीचा डोस मिळाले होते. त्यात 76 हजार कोविशील्ड व 28 हजार कोव्हॅक्सिनच्या लसीचा या मध्ये समावेश असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

महत्त्वाच्या बातम्या   

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!