Share

आपला संरक्षणकर्ता कोरोनाच्या विळख्यात, एकाच दिवसात 161 पोलिसांना कोरोना

Published On: 

 मुंबई : कोरोनाच्या संकटात खंबीरपणे उभी असलेली पोलीस यंत्रणा आता कोरोनाच्या कचाट्यात सापडली आहे. काल एका दिवसात 87 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आता कोरोनाबाधित पोलिसांचा आकडा हा 618 वर गेला आहे.

पोलिसांच्या बाबतीतली धक्कादायक माहिती समोर आली आहे. गेल्या 2 ते 3 दिवसात पोलिसांना सर्वाधिक कोरोनाचा संसर्ग झाला आहे. बुधवारी 6 मे रोजी 38, गुरुवारी 7 मे रोजी 36 आणि आज शुक्रवारी 8 मे रोजी एका दिवसात 87 पोलिसांना लागण झाली आहे. त्यामुळे अवघ्या तीन दिवसात 161 पोलिसांना कोरोना झाल्याचं समोर आलं आहे.

एकूण 618 पोलिसांमध्ये 71 अधिकारी आणि 547 पोलीस कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं स्पष्ट झालं आहे. कोरोनाची लक्षणे असलेल्या पोलिसांची संख्या मोठी आहे. 62 अधिकारी आणि 495 अशा एकूण 557 पोलिसांना कोरोनाची लक्षणे दिसून येत आहेत.

दरम्यान कोरोनाबाधित पोलिसांपैकी काल एकाच दिवसात 20 पोलीस कोरोनामुक्त झाले आहेत. तर आतापर्यंत नऊ अधिकारी आणि 47 पोलीस कर्मचारी असे एकूण 56 जण बरे होऊन घरी परतले आहेत.

महत्वाच्या बातम्या

करमाड रेल्वे दुर्घटनेतील मृत मजुरांच्या कुटुंबियांना प्रत्येकी ५ लाख : मुख्यमंत्री

चार दिवसात कोरोनाबाधितांचा आकडा 10 हजारने वाढला, मुंबईची परिस्थिती चिंताजनक !

चीनने गंभीर चूक केली आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रेसिडेंट ट्रम्प पुन्हा भडकले

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!