सोलापूर : कोरोना विषाणूची लागण झाल्यामुळे तेलंगी पाच्छा पेठ येथील एका किराणा दुकानदाराचा मृत्यू झाला होता. यानंतर या दुकानदाराच्या संपर्कात आलेल्या 91 जणांचे स्वँब तपासण्यात आले. यातील 67 जणांचे हाती आले आहेत. यामध्ये खाजगी रुग्णालयातील एका नर्सला कोरोनाची लागण झाल्याचे उघडकीस आले आहे.
लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार,अद्याप चोवीस जणांचे अहवाल हाती येणे बाकी आहे. या दुकानदाराने गेल्या महिनाभरात बाहेरगावी प्रवास केला नसल्याचे कुटूंबीय सांगत होते. त्यामुळे त्यांना नेमकी कोणापासून कोरोनाची लागण झाली याचा शोध घेण्याचे काम आरोग्य विभागाने हाती घेतले होते.
दरम्यान, मृत व्यक्तीच्या संपर्कातील लोकांची तपासणी करण्यात येत आहे. रुग्णालयातील एका नर्सचा संपर्क आल्याने त्या नर्सचा कोरोना अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. आरोग्य विभागाने रविवारी रात्री तेलंगी पाच्छा पेठेकडे जाणारे रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत. मृताचे कुटूंबीय, संपर्कात आलेल्या लोकांना सिव्हील हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. रविवारी त्यांची तपासणी झाली. त्यापैकी 66 जणांचे रिपोर्ट आले असून त्यात एका नर्स महिलेचा अहवाल पॉझीटीव्ह आला आहे.
दरम्यान,रविवारी सोलापुरात पहिल्यांदाच कोरोना संसर्ग झालेल्या एका व्यापाऱ्याचा बळी गेल्यानंतर अधिक सतर्क झालेल्या प्रशासनाने मृत व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांसह ६२ जणांना ताब्यात घेऊ न प्रत्येकाची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसेच ज्या भागात मृत्यू व्यक्ती राहत होती, त्या संपूर्ण तीन किलोमीटर परिसर प्रतिबंध क्षेत्र जाहीर करून तेथील सुमारे सात हजार घरांचे सर्वेक्षण सुरू केले आहे. तर दुसरीकडे करोना बळी गेल्याच्या घटनेचा सोलापूरकरांनी चांगलाच धसका घेतला असून परिणामी, प्रतिबंध क्षेत्राबाहेरसुद्धा जीवनाश्यक सेवा ठप्प झाल्या आहेत.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
