Share

वर्तमानपत्रामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ शकतो का ?

Published On: 

यवतमाळ : कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या अनुषंगाने वृत्तपत्रांबाबत व्हॉटसॲपवरून खोटा संदेश पसरविणा-याविरुध्द जिल्हा माहिती अधिकारी यांच्या तक्रारीवरून यवतमाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांनी दिली.

जिल्हा माहिती अधिकारी राजेश येसनकर यांना व्हॉट्सॲप ग्रुपवर ‘जिल्हाधिकारी यांच्या सुचना’ या अंतर्गत खोटा मॅसेज निदर्शनास आला. शिवाय या मॅसेजच्या खाली जिल्हा माहिती कार्यालय असे लिहिलेले आढळले. ही बाब जिल्हा माहिती अधिका-यांनी जिल्हाधिकारी यांच्या निदर्शनास आणून यात वृत्तपत्रासंदर्भात खोटी माहिती असल्याचे प्रशासनाला सांगितले. यावर तात्काळ कार्यवाही करून पोलिस स्टेशमध्ये तक्रार नोंदवा, असे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले. त्यानुसार या संदर्भात शहर पोलिस स्टेशमध्ये अज्ञात व्यक्तींविरुद्ध तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वृत्तपत्रे स्वयंचलित मशीनवर तयार केली जातात. कोणत्याही मॅन्युअल टचशिवाय तसेच ग्लोव्हज आणि फेसमास्क घातलेल्या हँडलरद्वारे वर्तमानपत्रांच्या छापील गठ्ठे वाहून नेले जातात. वाचकांच्या घरी पाठवण्यापूर्वी वृत्तपत्र डेपोमध्ये हायजीन प्रोटोकॉलचे अनुसरण केले जाते. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, घरांमध्ये वस्तूंच्या वितरणामध्ये दूषित होण्याचे प्रमाण अत्यंत कमी असते.

अग्रगण्य विषाणूशास्त्रज्ञांसह प्रख्यात डॉक्टरांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, घरी वितरित केलेल्या वृत्तपत्रांचा संसर्ग होण्याचा धोका नाही. कोरोना विषाणू संसर्गाबाबत जनजागृती करण्यासाठी तसेच आजारपणासंबंधीची सत्य माहिती लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी वृत्तपत्र हे विश्वासार्ह स्त्रोत आहे. त्यामुळे अफवा पसरविणा-या लोकांविरुध्द प्रशासनातर्फे कडक कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी एम. डी.सिंह यांनी सांगितले.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!