टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉक डाऊन करण्यात आलं आहे तरीही रुग्णांची संख्या रोजच्या रोज वाढत आहे. गेल्या २४ तासात देशात तब्बल १७५२ नवीन रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबतच वृत्त ANI या वृत्त विषयक संस्थेने दिलं आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार देशात गेल्या २४ तासात १७५२ नवीन रुग्णांची कोरोनाची चाचणी पॉझीटिव्ह आली आहे. यामुळे देशातील आतापर्यंत कोरोना झालेल्यांची संख्या आता २३ ,४५२ वर पोहोचली आहे.
आतापर्यंत देशांत ४८१३ कोरोन बाधित बरे झाले असून सध्या १७३१५ रुग्ण अजूनही कोरोनाशी झुंज देत आहेत. टर देशात कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या आता ७२३ झाली आहे यातील ३७ जणांचा मृत्यू गेल्या २४ तासात झाला आहे.
गेल्या २४ तासांत १७५२ नवीन लोकांना # सीओव्हीआयडी-१९ / कोरोना झाला आहे तर ३७ मृत्यूची नोंद झाली.देशात आता १७९१५ कोरोनाचे सक्रिय रुग्ण आहेत, तर ४८१३ बरे झाले आहेत आणि ७२४ जणांचा मृत्यू झालं आहे. देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या आता २३४५२ वर पोचली आहे: केंद्रीय आरोग्य मंत्रालय’
1752 new #COVID19 cases & 37 deaths reported in the last 24 hours. Total number of cases rises to 23,452, including 17915 active cases, 4813 cured & 724 deaths: Union Health Ministry pic.twitter.com/nX6m1yRjY9
— ANI (@ANI) April 24, 2020
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

