Share

कोरोना: पुणे विभागात आतापर्यंत सव्वाशे मृत्यू ; २३६४ रुग्ण तर ५५८ रुग्ण बरे होऊन घरी : डॉ. म्हैसेकर

Published On: 

पुणे :– पुणे विभागातील 558 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 364 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 1 हजार 681 आहेत. विभागात कोरोनाबाधीत एकुण 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 86 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

विभागात 2 हजार 364 बाधित रुग्ण असून 125 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यापैकी पुणे जिल्हयात 2 हजार 103 बाधीत रुग्ण असून 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सातारा जिल्हयात 78 बाधीत रुग्ण असून 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सोलापूर जिल्हयात 135 बाधीत रुग्ण असून 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सांगली जिल्हयात 34 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोल्हापूर जिल्हयात 14 बाधीत रुग्ण असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 2 हजार 103 झाली आहे. 499 कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 489 आहे. पुणे जिल्हयात कोरोनाबाधीत एकूण 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 83 रुग्ण गंभीर असून उर्वरीत निरीक्षणा खाली आहेत.

आजपर्यत विभागात 23 हजार 942 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यापैकी 22 हजार 823 चा अहवाल प्राप्त आहे. 1 हजार 119 नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 20 हजार 393 नमून्यांचा अहवाल निगेटीव्ह असून 2 हजार 364 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 71 लाख 40 हाजर 436 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 2 कोटी 79 लाख 65 हजार 967 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 1 हजार 618 व्यक्तींना अधिक तपासणीसाठी संदर्भीत करण्यात आले आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!