मुखेड/प्रतिनिधी : कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या बाबतीत नांदेड जिल्हा व तालुका पातळीवरील अधिकारी ज्या जागरूकपणे काम करत आहेत. ते काम गावपातळीवर दिसून येत नाही.
कोरोना विषाणूवर प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी गावपातळीवर समिती गठीत करण्याचे आदेश देण्यात आले. मात्र अनेक गावातील कर्मचाऱ्यांकडून याचे गांभीर्य घेण्यात आले नाही. त्यांच्यावर कडक स्वरूपाची कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी व गावपातळीवर समिती गठीत करण्याच्या आदेशाचे पालन व्हावे व कोरोनाबाबत प्रतिबंधात्मक उपाययोजना राबविण्यात याव्यात अशी मागणी रयत शेतकरी युवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिवशंकर पाटील कलंबरकर यांनी मुखेड तहसीलदार यांची भेट घेऊन लेखी निवेदन व्दारे केली आहे.
यावेळी शादुल होनवडजकर, रियाजभाई, महेताब शेख, जयभीम सोनकांबळे उपस्थित होते महाराष्ट्रात सध्या लॉकडाऊन व संचारबंदी लागू आहे. याचे गांभीर्य नागरिक म्हणून आपण घेतले पाहिजे. आपण स्वतःची व कुटुंबाची काळजी घेतली पाहिजे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आदेशाचे पालन केले पाहिजे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

