तुळजापूर – तालुक्यात आँगस्ट महिन्यात कोरोना बाधीतांची संखेने वेगाने वाढत असतानाच कोरोना जनतेला होवू नये या साठी रस्त्यावर उतरुन काम करणाऱ्या अधिकारी कर्मचारी वर्गातील कोरोना योध्दांना आता कोरोना होत असल्याने सर्वञ खळबळ उडाली आहे.
जिल्हयात पहिले तीन महिने प्रशाषणाने अथक परिश्रम घेतल्याने कोरोना आटोक्यातठेवला होता. माञ त्यानंतर कोरोना चा संसर्ग वाढत गेल्याने कोरोना ग्रस्तांचा मदतीसाठी असलेल्या कोरोना योध्दांना लागण होण्यास आरंभ झाल्याने चिंतेचे वातावरण पसरले आहे.
तुळजापूर तालुक्यातील बहुंताशी प्रमुख अधिकारी वर्गाचे कोरोना रिपोर्ट पाँजिटीव्ह आले असुन आता कर्मचारी वर्गाचेही रिपोर्ट जशीजशी तपासणी होत आहेत तसतसे पाँजिटीव्ह येत असल्याने हा प्रकार चिंता वाढवणारा ठरणार आहे.
तुळजापूर तालुक्यातील महसुल पोलिस आरोग्य खात्यातील अधिकारी कर्मचारी यांचे निकाल कोरोना पाँजिटीव्ह येत होते. यात आता नगरपरिषद चे तीन कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट शुक्रवार रोजी पाँजिटीव्ह आल्याने खळबळ उडाली आहे. यात नगरपरिषद च्या वीस कर्मचाऱ्यांचे गुरुवार रोजी स्वँब घेतले होते त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांचे रिपोर्ट पाँजिटीव्ह आल्याने त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आले आहे सध्या काही अधिकारी कर्मचारी उपचार घेत आहेत.
विशेष म्हणजे हे अधिकारी कर्मचारी मोठ्या प्रमाणात लोकांच्या संपर्कात येणारे असल्याने चिंता वाढली आहे. या अधिकारी वर्गात कोरोना लक्षणे दिसत नव्हते तरीही त्यांचे रिपोर्ट पाँजिटीव्ह आल्याने अधिकारी कर्मचारी वर्ग ही या प्रकाराने अंचबित झाला आहे.कोरोना चा वाढता कहर माञ प्रशासाणास डोकेदुखी ठरत आहे.
महत्वाच्या बातम्या नक्की वाचा –
खोटारड्या मेटेंनी मराठा समाजाचा विश्वास केव्हाचा गमावला आहे;सचिन सावंताची जहरी टीका
देश भावूक होतो अन हे फाईल्स गायब करतात, चीनच्या मुद्द्यावरून राहुल गांधींचा परत मोदींवर निशाणा
भाजपच्या मनात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबाबत द्वेष का आहे ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

