Share

देशभरात २४ तासात १२२९ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण; करोनाग्रस्तांची एकूण संख्या २१ हजार ७००

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – देशभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्येत वाढ होत असून याबाबतची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे. याबाबतच वृत्त संस्थेने दिली आहे.

गेल्या २४ तासात १२२९ नवे करोना पॉझिटिव्ह रुग्ण देशभरात आढळले आहेत. तर ३४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील करोनाग्रस्तांची संख्या २१ हजार ७०० झाली आहे. आत्तापर्यंत ४ हजार ३२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर करोनाची लागण झाल्याने आत्तापर्यंत ६८६ जणांचा मृत्यू देशभरात झाला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही माहिती दिली आहे.

२१ हजार ७०० रुग्णांपैकी आत्तापर्यंत ४ हजार ३२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. करोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. ३ मेपर्यंत हा लॉकडाउन असणारच आहे. २७ एप्रिलला सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संवाद साधणार आहेत. त्यानंतर लॉकडाउन वाढवायचा की नेमकं काय करायचं याचं धोरण ठरवलं जाण्याची शक्यता आहे.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!