🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – वन्यप्राण्यांचे जतन आणि संवर्धन याबाबत पुरेशी जनजागृती झालेली नाही. हौस म्हणून आपण काय काय खाणार आहोत? कोरोना व्हायरस कोणत्या प्राण्यातून आला आहे, हे अजून कळलेलं नाही. जगाचा नाश करायला एक विषाणू पुरेसा आहे, असं ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांनी म्हटलं आहे.
तसेच कोरोनाने जगाला मोठा धडा शिकवला आहे. आता तरी आपण जागे होणार आहोत का?, असा सवालही प्रकाश आमटे यांनी उपस्थित केला आहे. राजहंस प्रकाशनातर्फे टेरी इरविन यांनी लिहिलेल्या आणि सोनिया सदाकाळ-काळोखे अनुवादित ‘स्टीव्ह आणि मी’ या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवारी डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांच्या हस्ते झाला. यावेळी प्रकाश आमटे बोलत होते.
दरम्यान,’आपणच निसर्गाचा समतोल बिघडवला आहे. त्यामुळे मनुष्यप्राणी आणि वन्यप्राणी यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. वन्यप्राण्यांना जगण्याचा अधिकार आहे, हे आपल्याला अजून समजलेले नाही. अशी टिप्पणीही त्यांनी यावेळी केली आहे.
हेही पहा –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

