Share

‘कोरोना गो ; अमृतमहोत्सवी वर्षात कोरोनाचा विखार नष्ट होऊन सर्वांना आरोग्याचे अमृत लाभो’

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानातील समतावादी भारत साकार करण्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार कटिबद्ध आहे, असे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी 75 व्या स्वातंत्र्य दिनाच्या देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. संविधानिक मूल्यांच्या आधारावर भारतीय स्वातंत्र्य दिन चिरायू होत राहिल असा विश्वास रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

नवी दिल्लीतील सफदर जंग रोड येथील शासकीय निवासस्थानी रामदास आठवले यांनी 75 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण केले. यावेळी त्यांच्या पत्नी सीमा आठवले, मुलगा जित आठवले आदी उपस्थित होते.

सध्या देशात आणि संपूर्ण जगात कोरोनाचा कहर झाला आहे. भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षात कोरोनाचा विखार नष्ट होऊन सर्वांना आरोग्याचे अमृत लाभो, अशा शुभेच्छा स्वातंत्र्य दिनानिमित्त दिलाय यावेळी रामदास आठवले यांनी ‘गो कोरोना गो, गो कोरोना गो’ चा नारा पुनश्च एकदा दिला आहे.देशात वंचित घटकांना सामाजिक न्याय देण्यासाठी रिपब्लिकन पक्ष कटिबद्ध आहे, असे रामदास आठवले यावेळी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!