Share

कोरोनामुक्त झालेल्या कनिका कपूरने प्लाझ्मा डोनेट करण्याचा घेतला निर्णय

Published On: 

मुंबई : गायिका कनिका कपूर कोरोना विषाणुमुळे चर्चेत आली आहे. कानिकाला कोरोनाची लागण झाल्याने अनेकांच्या डोकेदुखीत वाढ झाली होती. कनिला कपूरला कोरोना विषाणूची लागण झाली होती. तिची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आल्यापासून तिच्याबद्दल बर्याच बातम्या आल्या आहेत. तिच्यावर बेजबाबदारपणाचा आरोप सुद्धा करण्यात आला होता. दरम्यान, कोरोनाच्या ३ चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर तिला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

या सहा एप्रिल रोजी लखनऊच्या पीजीआयएमएस रुग्णालयातून कनिका कपूरला डिस्चार्ज मिळाला. कोरोना व्हायरसची लागण झाल्यानंतर दोन आठवडे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. २० मार्च रोजी सर्वप्रथम तिला कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. कोरोनाची लागण झालेली बॉलिवूडमधील ती पहिली सेलिब्रिटी आहे.

दरम्यान, कोरोनामुक्त झालेल्या कनिका कपूरने प्लाझ्मा डोनेट करण्याचा निर्णय घेतला असून कनिका कपूरला अलीकडेच रुग्णालयातून डिस्चार्ज देण्याता आला आहे. प्लाझ्मा थेरपी कोरोना व्हायरसच्या उपचारांमध्ये प्रभावी ठरत आहे. प्लाझ्मा थेरपीमुळे गंभीर अवस्थेत असलेल्या अनेक रुग्णांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा झाली आहे.

कनिका कपूरच्या रक्ताची तपासणी लखनऊच्या किंग जॉर्ज मेडिकल हॉस्पिटलमधील डॉक्टरांची टीम करणार आहे. त्यानंतरच ती प्लाझ्मा डोनेट करु शकते का? ते स्पष्ट होईल. यासंदर्भातील वृत्त इंडिया टुडेने दिले आहे. कनिका कपूरला डॉक्टरांनी परवानगी दिली तर २८ किंवा २९ एप्रिलला केजीएमयू रुग्णालयात प्लाझ्मा डोनेट करु शकेल.

बाळासाहेबांच्या जिवलग ‘सामना’बद्दल या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!