Share

चंद्रपूरचे दाम्पत्य कोरोनामुक्त ! डॉक्टर व परिचारिकांनी टाळ्या वाजवून अभिनंदन ; रुग्णवाहिकेने पोहोचले स्वगृही

Published On: 

🕒 1 min read

नागपूर : दिल्लीमार्गे इंडोनेशियावरून नागपूरला परत आलेले मुळचे चंद्रपूर येथील कोविड-१९ पॉझिटिव्ह ठरलेले दाम्पत्य बुधवारी (ता.२२) पूर्णपणे बरे होउन घरी परतले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडीकल) कोरोना कक्षातून बाहेर पडल्यानंतर दोन्ही रुग्णांचे तेथील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले आणि तेथून निरोप दिला. मेडीकलमधून रुग्णवाहिकेने या पती आणि पत्नी दोघांनाही चंद्रपूरला स्वगृही पोहोचविण्यात आले आहे.

नागपूर शहरात कोरोनाचा धोका वाढत असतानाच आज काहीशी दिलासादायक घटना घडली. इंडोनेशिया येथून दिल्लीमार्गे नागपूरला आलेल्या ३९ वर्षीय व्यक्तीचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर ६ एप्रिलला त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोरोना कक्षामध्ये उपचार सुरू करण्यात आले. दुस-या दिवशी ७ एप्रिलला त्यांच्या ३२ वर्षीय पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्यावरही उपचार सुरू झाले.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्या मार्गदर्शनात तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. त्यांच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर ३९ वर्षीय पतीला सुट्टी देण्यात आली. मात्र पत्नीचा अहवाल अद्यापही निगेटिव्ह न आल्याने त्यांना सुरक्षितरित्या रुग्णालयातच ठेवण्यात आले. अखेर बुधवारी (ता.२२) त्यांच्या पत्नीचाही अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली व सुखरूप घरी पाठविण्यात आले.

यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.सजल मित्रा, वैद्यकीय अधीक्षक डॉ.अविनाश गावंडे यांच्यासह डॉ.कांचन वानखेडे, डॉ. फैजल, डॉ. स्नेहल, डॉ.मुरारी सिंग, डॉ.श्याम राठोड, डॉ. चेतन वंजारी, डॉ.विपुल मोदीख डॉ. पटनाईक, मालती डोंगरे, फार्मासिस्ट श्री.चक्रबर्ती यासर्वांसह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.

रुग्णालयातून रुग्णांना सुट्टी देण्यात आली असली तरी त्यांना १४ दिवस ‘होम क्वॉरंटाईन’ राहणे बंधनकारक आहे.

मेडीकल प्रशासनातर्फे वेळोवेळी प्रकृतीची विचारपूस करून आवश्यक उपचार करण्यात आले. त्यांच्याकडून मिळालेल्या सहकार्यामुळेच आज आम्ही पूर्णपणे बरे होउन घरी जात आहोत. सर्व नागरिकांनीही शासन आणि प्रशासनातर्फे करण्यात येणा-या आवाहनांचे पालन करून घरीच राहावे, असे आवाहन बरे झालेल्या दाम्पत्यातर्फे करण्यात आले आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!