Share

कोरोना इफेक्ट : शेअर बाजारात पडझड, सर्किट डाऊन लागलं

Published On: 

टीम महाराष्ट्र देशा – जागतिक महामारी कोरोनामुळे संपूर्ण जगच आता संकटात आला आहे. जगातील सर्व आर्थिक व्यवहारांना कोरोनाचा फटका बसला आहे. उत्पादन व्यावस पूर्ण ठप्प आहे तर सेवा उद्योगालाही फटका बसला आहे. यामुळे गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहे.

याचच प्रतिबिंब आज भारतीय भांडवली बाजारात बघायला मिळालं आहे. आज शेअर बाजार उघडला तोच पडझडीने आणि अवघ्या एका तासात शेअर बाज्जार तब्बल १० %नी कोसळला. त्यामुळे काही वेळासाठी बाजारातील व्यवहार बंद करण्यात आले आहेत.

त्यामुळे गुंतवणूकदारांचे अवघ्या काही मिनिटांमध्ये लाखो करोड रुपये बुडाले आहेत. आज बाजार उघडल्या नंतर काही वेळातच मुंबई शेअर बाजारात २९०० अंकांची घट झाली तर निफ्टी मध्येही ८०० पेक्षा जास्त घट झाली आहे. बाजार १०:५८ ला पुन्हा सुरु करण्यात आला.

सर्किट डाऊन

शेअर बाजारात एका दिवसात १० % पेक्षा जास्त घट किवा वाढ झाल्यास काही वेळा यासाठी बाजार बंद केला जातो. याला सर्किट लागण असं म्हणतात.

हेही पहा –

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!