कोल्हापूर : संपूर्ण जगभरामध्ये थैमान घालणाऱ्या महामारी कोरोना व्हायरस ने मागच्या काही दिवसांपूर्वी भारतामध्ये प्रवेश केला आणि अतिशय वेगाने पसरणारा हा विषाणू आता महाराष्ट्रामध्ये देखील त्याच प्रमाणात पसरत आहे. राज्यात कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यामुळे भीतीचे वातावरण पसरले आहे. आतापर्यंत राज्यात कोरोनाचे २६ जण रुग्ण सापडले आहेत.
या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व महापालिका, नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद राहणार आहेत. याशिवाय, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा , राजकीय सर्व कार्यक्रमांची परवानगी देखील रद्द करण्यात आली आहे.
याच विषाणू चा फटका कोल्हापुरातील ज्योतिबा मंदिराला पण बसला असल्याचे पाहायला मिळत आहे.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिर अखेर बंद करण्यात आले आहे. ज्योतिबाचे दर्शन मध्यरात्रीपासून बंद केले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर प्रशासनाचा निर्णय झाला असून, ज्योतिबाच्या चैत्र यात्रेवर देखील कोरोनाचे सावट आहे. महाराष्ट्रातील करोनाग्रस्तांची संख्या आजच्या घडीला २६ वर गेली आहे. यात पुण्यात १०, मुंबईत ५, नागपूरमध्ये ४, पनवेलमध्ये १, कल्याणमध्ये १, ठाण्यात १ यवतमाळमध्ये २, कामोठे या ठिकाणी १ असे एकूण २६ रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचं आढळलं आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

