Share

#Corona : दिल्लीमुळे देशाला फटका, तबलीग-ए-जमातचे अनेक प्रतिनिधी संपूर्ण देशात पसरले

Published On: 

🕒 1 min read

नवी दिल्ली : दिल्लीतून एक धक्कादायक वृत्त समोर आले आहे. निजामुद्दीन परिसरात आयोजित करण्यात आलेल्या धार्मिक यात्रेमुळे दिल्लीमध्ये कोरोनाबाधीतांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वी  निजामुद्दीन परिसरात तबलीग-ए-जमातचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये जगातून मुस्लीम धर्माचे अनेक प्रतिनिधी एकत्र आले होते.

त्यानंतर त्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या अनेक लोकांमध्ये कोरोना व्हायरसची लक्षणं दिसून आली होती. याबाबत माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तो परिसर सील करत शेकडो लोकांच्या टेस्ट केल्या आहेत. या कार्यक्रमात सहभागी झालेल्यांपैकी जवळपास 200 जणांना कोरोनाची लागण झाल्याची भीती वर्तवण्यात येत आहे. तर या यात्रेत सहभागी झालेले काही प्रतिनिधी हे देशभरात पसरले असल्याची माहिती मिळत आहे.

या परिषदेतून बाहेर पडलेल्या 6 जणांचा तेलंगणात तर कर्नाटक, तामिळनाडू, जम्मु काश्मीर आणि मुंबईतील प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर, 24 लोकांना आतापर्यंत कोरोनाची लागण झाली आहे.  सध्या निजामुद्दीन परिसर संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहेत. आतापर्यंत 200हून अधिक लोकांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तब्बल 2 हजार लोकांना होम क्वारंटाईन आणि 400 घरांवर पहारे ठेवण्यात येत आहेत. या एका परिषदेमुळे देशभरात कोरोना पसरण्याची शक्यता आहे.

दरम्यान या प्रकरणाचा आढावा घेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारवाईचे आदेश दिले आहेत. तसेच दिल्ली प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे आज संपूर्ण देशाला याचा फटका सहन करावा लागणार असल्याच बोललं जात आहे.

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!