🕒 1 min read
मुंबई : वाढत्या कोरोनाबाधितांचा आकडा लक्षात घेता मुंबई महापालिकेने मोठा निर्णय घेतला आहे. वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारण्याची तयारी मुंबई महापालिकेने केली आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी जून महिन्यात कोरोना विषाणू बाधितांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती व्यक्ती केली आहे. त्यासाठी पूर्वतयारी म्हणून लाखभर खाटांची व्यवस्था करण्यात येत असल्याची माहिती आरोग्यमंत्री टोपे यांनी दिली आहे.
कोरोनाचा सामना करण्यासाठी मुंबई महापालिके वानखडे स्टेडियममध्ये क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारण्याची तयारी केली आहे. याबाबत आयुक्तांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्रही लिहिलेले आहे. यामध्ये वानखेडे स्टेडियमवर कोरोनव्हायरसचा मुकाबला करण्यासाठी कोविड -१९ रुग्णांना क्वारंटाईन करण्यासाठी जागा मागितली आहे. याबाबत एमसीएला पत्र पाठविण्यात आले आहे. त्यानुसार येथे ५०० खाटांसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान मुंबईतल्या वांद्रे-कुर्ला संकुलातील विशेष कोविड रुग्णालयाची राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांकडून पाहणी करण्यात आली. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गोरेगावातल्या कोरोना केअर सेंटरला भेट दिली. त्याचवेळी वानखेडे स्टेडियमवर क्वारंटाईन जम्बो सेंटर उभारण्याची संकल्पा ठेवण्यात आली.
‘ए’ प्रभागातील सहाय्यक महानगरपालिका आयुक्त चंदा जाधव यांनी जारी केलेल्या पत्रात हॉटेल, लॉज,क्लब,कॉलेज,प्रदर्शन केंद्रे, वसतिगृह, विवाहगृह, जिमखाना ,मेजवानी हॉल तातडीने देण्यात यावेत अशी विनंती केली आहे.तर बृहन्मुंबई महानगरपालिकाने शुक्रवारी मुंबई क्रिकेट असोसिएशनला वानखेडे स्टेडियमची काही सुविधा वापरण्याबाबत नोटीस बजावली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
भाजपने सावध राहावे अन्यथा नव्या भूकंपाची वात पेटेलं, शिवसेनेचा सल्ला
कोरोनाची स्थिती पाहून 30 मे नंतर आषाढी वारी पालखी सोहळयाबाबत अंतिम निर्णय – अजित पवार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
